तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : चवदार तळ्याचे पाणी पिणारा अमर होणार नाही. न पिणारा मरणारही नाही. पाणी हे जीवन आहे. निसर्गाकडून मिळालेला आहे म्हणून पाण्यावर प्रत्येक माणसाचा हक्क आहे.सामाजिक समता निर्माण करण्यासाठी 27 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या काठी रणसिंग फुंकले. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी व्यक्त केले.
तत्कालीन परिस्थितीत माणसाला माणूस म्हणून ही जगता येत नव्हतं जनावरांना पाणी प्यायला मिळायचं पण माणूस त्या पाण्याला स्पर्श करू शकत नव्हता अशा काळात बाबासाहेबांनी सामाजिक समतेसाठी, न्याय हक्कासाठी लढले.बाबासाहेबांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. बाबासाहेबांचे सामाजिक समतेसाठी योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.आपण सर्वांनी संविधानाचे पाईक होऊया असे आवाहन केले.
जवाहर महाविद्यालय अणदूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत चवदार तळ्याचे सत्याग्रह शताब्दी वर्ष साजरा करण्यात आले.त्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ.सुनील राजपूत, डॉ. विवेकानंद वाहुळे,डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक डॉ. सुनील राजपूत यांनी केले सूत्रसंचालन डॉ.मल्लिनाथ बिराजदार यांनी व आभार डॉ.विवेकानंद वाहूळे यांनी केले. निबंध, वक्तृत्व, लघुनाटय स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, डॉ.डी. एस. कांबळे, प्रा. शैलेश शाईवाले, संतोष चौधरी, दिलीप चव्हाण, गणेश सरजे ,महादेव काकडे, बसवंत बागडे यांचे सहकार्य लाभले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या काठी समतेचे रणशिंग फुंकले – प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी

0Share
Leave a reply












