मानोरी (प्रतिनिधी) / सोमनाथ वाघ : समाजातील माणसाला माणसाशी जोडण्याची काम वारकरी संप्रदाय करत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये गुणदोष शोधून त्यांना योग्य दिशेला जोडण्यासाठी शिक्षक काम करतात. राहुरी तालुका हा प्रेरणादायी आहे. श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक उत्तमराव खुळे यांचे कार्य देखील दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन नेवासा येथील संत तुकाराम महाराज देवस्थानचे मठाधिपती हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
राहुरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारण मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक उत्तमराव हनुमंता खुळे यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते.
हभप उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की, राहुरी तालुक्याशी एक प्रकारे धार्मिक व भावनिक सलोखा असल्याने तालुक्यातील शिक्षण क्षेत्राशी सातत्याने संपर्क येतो. उत्तमराव खुळे यांचे संपूर्ण जीवनपट जर पाहिला तर तो प्रामुख्याने विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी त्यांनी काम केले परंतु विद्यार्थी हा घटक अग्रस्थानी ठेवला त्यांच्या कार्याची विशेष आहे. शिक्षण क्षेत्रासाठी यापुढे देखील त्यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य करावे असे देखील मंडलिक महाराज यांनी सांगितले.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे म्हणाले की, उत्तमराव खुळे यांनी पदाच्या माध्यमातून विद्यार्थी व सहकार्यांना नेहमीच आपुलकीची व सन्मानाची वागणूक दिली. विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना समाजाला देखील मार्गदर्शन करण्याचे काम केले. शिक्षण मंडळाच्या ब्राम्हणी, मांजरी,मानोरी, राहुरी, राहुरी फॅक्टरी आदी ठिकाणी त्यांनी सेवा केली. अध्यापनाचे काम करत असताना त्यांनी माणसे जोडण्याचे देखील काम केले. निश्चित त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे उल्लेखनीय काम केले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक उत्तमराव खुळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आज हा कार्यक्रम सत्कार होत असताना खरंतर डोळ्यात अश्रू तरळत आहे. नोकरीला सुरुवात केल्यापासून आज अखेर ज्या मान्यवरांनी नेहमी मार्गदर्शन केले त्यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपण सेवेतून निवृत्त होत असतो तरी यापुढे देखील विद्यार्थ्यांसाठी व समाजातील घटकांसाठी काम करत राहणार असल्याचे उत्तमराव खुळे यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक उत्तमराव खुळे, त्यांच्या धर्मपत्नी सौ. वैशालीताई खुळे यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार व सन्मान चिन्ह प्रदान करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते आसाराम ढुस, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, उत्तमराव म्हसे, डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक रावसाहेब (चाचा) तनपुरे, ज्ञानेश्वर कोळसे, भारत वारुळे, कृष्णा मुसमाडे, सुनील मोरे, जनार्दन गाडे, वैशाली तारडे, ज्ञानेश्वर खुळे, ज्ञानेश्वर पवार, भास्कर ढोकणे, प्रकाश भुजाडी, अरुण ठोकळे, उत्तमराव आढाव, आण्णासाहेब चोथे, आबासाहेब वाळुंज, शिवाजीराव कपाळे, अरुण ढूस, साहेबराव तोडमल, बापूसाहेब वाघ, शरदराव पोटे, भास्कर भिंगारे, जालिंदर खडके, सर्जेराव पेरणे, प्रभाकर हरिश्चंद्रे, शिवाजी खडके यांच्यासह श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळांमधील आजी-माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक अप्पासाहेब ढोकणे यांनी केले.
विद्यार्थी योग्य दिशेला जोडण्याचे काम शिक्षक करतात – हभप उद्धव महाराज मंडलिक, प्राचार्य उत्तमराव खुळे यांचा सेवपूर्ती समारंभ संपन्न

0Share
Leave a reply












