नांदेड (प्रतिनिधी) / धम्मदीप भद्रे : नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिके वाहून गेली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केवळ ग्रामीण भागच नव्हे तर नायगाव शहरातील अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कापड दुकाने, भांडी दुकाने, मोबाईल दुकाने तसेच मोटरसायकल शोरूममध्ये पाणी शिरल्यामुळे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे साहित्य व वस्तू खराब झाल्या आहेत.या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज नायगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
पूरग्रस्त शेतकरी व व्यापाऱ्यांनी शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी पालकमंत्री यांच्याकडे उमरी, धर्माबाद व नायगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून त्वरित मदत देण्याचे निवेदन सादर केले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संत तुकाराम हंबर्डे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार, श्री श्रावण पाटील भिलवंडे, भाजप नायगाव तालुका अध्यक्ष श्रीहरी देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नायगाव तालुक्यातील पूरस्थितीची पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पाहणी, शेतकऱ्यांचे पिके व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान ; तातडीने मदतीची मागणी

0Share
Leave a reply












