SR 24 NEWS

राजकीय

पिंपरी अवघड ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ.मीनाक्षीताई लांबे यांची बिनविरोध निवड

Spread the love

राहुरी प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सुरशे ) : राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माजी सरपंच सौ. मीनाक्षीताई सुरेशराव लांबे यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत सौ. लांबे यांच्या उमेदवारीला सर्वानुमते पाठिंबा देत ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला. त्यांच्या निवडीसाठी उपसरपंच लहानु तमनर यांनी सूचक तर माजी सरपंच सौ. परवीनबानो शेख, माजी सरपंच सौ. रेखा पटारे आणि माजी उपसरपंच शिवाजी लांबे यांनी अनुमोदक म्हणून काम पाहिले.

निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी महसूल विभागाचे विजय बेरड व कामगार तलाठी तुषार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. ग्रामविकास अधिकारी सौ. शुभांगी चोखर, ग्रामसेवक कृष्णा कांबळे व संजय वाघमारे यांनी देखील संपूर्ण प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

यावेळी गावातील मान्यवर, माजी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ऋषिकेश लांबे, बादशाह शेख, मोहन लांबे, बबन शेख, तुकाराम शिंगाडे, बाळूभाऊ लांबे, गंगाधर कांबळे, सोमनाथ लांबे, बाबुराव विरकर, राजेंद्र लांबे, अनिल बर्डे, राजू गायकवाड, मुन्ना शेख, सुभाष कांबळे, गणेश जगधने आदींसह अनेक ग्रामस्थांचा सहभाग होता.

नवनिर्वाचित सरपंच सौ. मीनाक्षीताई लांबे यांचा ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामस्थांनी त्यांना भावी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सौ. लांबे यांनी विश्वास व्यक्त करत ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!