SR 24 NEWS

क्राईम

राहुरीत साईनगर परिसरात धक्कादायक घरफोडी दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / सोमनाथ वाघ :राहुरी शहरातील साईनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. नयन दीपक तोडमल (वय ३२ वर्षे, रा. साईनगर, राहुरी बु., ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) हे आपल्या कुटुंबासह राहुरी येथे वास्तव्यास आहेत. दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेपासून ते १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२.५५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

सकाळी ही बाब लक्षात येताच डॉ. नयन तोडमल यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय नवले करीत आहेत. पुढील तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!