SR 24 NEWS

क्राईम

गोदावरी पात्रातून अवैध वाळू चोरीचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : नायगाव येथील गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना बेकायदा वाळू चोरी व चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ११) नायगाव शेती गट क्र. ३९० च्या किनारी करण्यात आली.

याप्रप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी केशव वारे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चंद्रशेखर  आगे (रा. श्रीरामपूर), निलेश एकनाथ शेंडगे (रा. नेवासा), निलेश दीपक जाधव, अमित परशुराम कुटे (रा. शिर्डी), शंकर उमाप, चेतन पेत्रस खाजेकर आणि इतर ३ ते ४ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.आरोपींनी संगनमत करून शासनाचा कोणताही परवाना नसताना बेकायदा वाळू उपसा व चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ६२, ३ (५) आणि पर्यावरण कायदा कलम ३/१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारी अधिकारी अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामेश्वर ढोकणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात BNSS कलम १७३ प्रमाणे ‘ई-साक्ष’  पंचनामा करण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!