राहुरी (प्रतिनिधी) : श्रीरामपूर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात ३० जुलै २०२५ रोजी एक धक्कादायक घटना घडली असून न्यायालयीन कामकाज सुरू असताना अँड. दिलीप दत्तात्रय औताडे यांच्यावर एका पक्षकाराने थेट कोर्ट हॉलमध्येच हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात अँड.औताडे जखमी झाले असून, या घटनेमुळे न्यायालयीन वकिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अँड. औताडे हे संबंधित प्रकरणात उलट तपासणी करत असताना, पक्षकाराने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवून जबरदस्त मारहाण केली. ही घटना घडत असताना न्यायालयीन परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील वकिल संघाने राहुरी तहसीलदार कार्यलय येथे येवून एकत्र येऊन तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे निवेदन तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरांवरून निषेध करत, वकिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ “वकिल संरक्षण कायदा” लागू करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
राहुरी वकिल संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर शासन वकिल संरक्षण कायदा लागू करण्यात दिरंगाई करत असेल, तर वकिलांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी राहुरी वकील संघाकडून करण्यात आली.
हा प्रकार म्हणजे न्यायालयीन स्वायत्ततेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवरच आघात असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे न्यायालयीन परिसरातील सुरक्षाव्यवस्था आणि कायद्याच्या रक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नव्याने विचार करण्याची गरज आहे.
श्रीरामपूर न्यायालयात वकिलावर हल्ला प्रकरणी राहुरी तालुका वकिल संघाकडून तीव्र निषेध, वकिल संरक्षण कायद्याची मागणी

0Share
Leave a reply












