SR 24 NEWS

सामाजिक

राहुरी फॅक्टरीत भव्य कानिफनाथ मंदिर उभारणीस सुरुवात; भूमिपूजन सोहळा उत्साहात

Spread the love

राहुरी फॅक्टरी : ओम चैतन्य कानिफनाथ भक्त मंडळाच्या संकल्पनेतून आणि गुरुवर्य सुरेश अण्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडीच्या पाठीमागील साई नगरी परिसरात कानिफनाथ महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा विधिवत शुभारंभ आज (गुरुवार) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

या प्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भूमिपूजनानंतर त्रिदिनी गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता झाली. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश सीनारे, चंद्रकांत चव्हाण, विकी साळुंके, सुनील जाधव, बंटी भगत, ऋषिकेश शिंदे, नवनाथ वाकचौरे, अजय गीते, महेश सीनारे, सचिन शेळके आदी नाथभक्तांनी मोठे योगदान दिले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!