SR 24 NEWS

इतर

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी – ब्रम्हपुरी तालुक्यात भीतीचं वातावरण; ग्रामस्थांनी केली सुरक्षा उपाययोजनांची मागणी

Spread the love

ब्रम्हपुरी प्रतिनिधी / रोशन खानकुरे : ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 154 अंतर्गत जंगल परिसरात गुरुवारी सकाळी भयावह घटना घडली. जयपाल लक्ष्मण उईके (वय अंदाजे ४५), हे गायी चारत असताना वाघाने अचानक हल्ला चढवत त्यांच्यावर जीवघेणा वार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, ग्रामस्थांमध्ये वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी आहे. “दरवर्षी हल्ले होतात, पण उपाय काहीच नाहीत” असा संताप अनेकांनी व्यक्त केला आहे.

सध्या शेतीची कामं सुरू असल्याने शेतकरी आणि गुराख्यांना दररोज जंगलालगतच्या भागात जावं लागतं. मात्र वाढती वाघांची वावर आणि वनविभागाची निष्क्रियता यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती होते; पण सुरक्षा उपाययोजना केवळ कागदावरच मर्यादित राहतात.

जंगलालगतच्या गावांमध्ये गस्त वाढवावी, सीमारेषांवर अत्याधुनिक यंत्रणा व कॅमेरे बसवावेत, जखमी व्यक्तीस तातडीने आर्थिक मदत व मोफत उपचार उपलब्ध करून द्यावेत दरम्यान, वनविभाग व पोलीस प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला असून वाघाचा माग काढण्यासाठी पथके जंगलात रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपशील प्रतीक्षेत आहे. गावकऱ्यांनी लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत अशी मागणी करत रात्री गस्त पथक आणि संरक्षण उपाय योजनांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!