SR 24 NEWS

इतर

सिंदेवाहीत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध उपक्रमांची आखणी

Spread the love

सिंदेवाही प्रतिनिधी / रोशन खानकुरे : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार सिंदेवाही तहसील कार्यालयाच्यावतीने 01 ऑगस्ट 2025 ते 07 ऑगस्ट 2025 या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात महसूल विभागाशी निगडित विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदार श्री. संदीप पानमंद यांनी सिंदेवाही तालुक्यातील सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

महसूल सप्ताहाचे संपूर्ण आयोजन पुढील प्रमाणे आहे:

1.ऑगस्ट 2025 – महसूल दिन साजरा करून सप्ताहाचा औपचारिक शुभारंभ.

2. ऑगस्ट 2025 – शासकीय जमिनीवरील राहणीसाठी अतिक्रमण कायदेशीर ठरवून पट्टे वाटप.

3. ऑगस्ट 2025 – पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करून रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण.

4 ऑगस्ट 2025 – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मंडळनिहाय शिबिरे आयोजित करून विविध योजनांचा लाभ देणे.

05 ऑगस्ट 2025 – विशेष सहाय्य योजना (संगायो / इंगायो) लाभार्थ्यांना DBTसाठी थेट घरभेट.

06 ऑगस्ट 2025 – शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणांची निष्कासने.

07 ऑगस्ट 2025 – M-Sand धोरणाची अंमलबजावणी व महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ.

या सप्ताहात महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाच्या योजना आणि सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार असून, शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यायचा सुवर्णसंधी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शासनाच्या सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!