SR 24 NEWS

क्राईम

बेकायदा कोयता बाळगणाऱ्या तरुणाला श्रीरामपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर शहरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, संजयनगर परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने कोयता बाळगणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला श्रीरामपूर शहर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास संजयनगर येथील ईदगाह मैदानाजवळ एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली.

पोलिसांनी अल्लाबख्श राजू शेख (वय २३, रा. संजयनगर, वार्ड नं. २, श्रीरामपूर) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना बेकायदा शस्त्र आढळून आले. आरोपीकडून अंदाजे ५०० रुपये किमतीचा, ४१ सेंटीमीटर लांबीचा, लोखंडी पाते असलेला हिरव्या मुठीचा कोयता जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित अशोक पटारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेलार करीत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!