राहुरी वेब प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथे किरकोळ कारणावरून एका इसमास लोखंडी पाईप व लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ज्ञानदेव भागीनाथ बर्डे (वय ४०, रा. मोकळ ओहळ) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ज्ञानदेव बर्डे हे त्यांच्या गावात असताना राजू नामदेव बर्डे, लोंढ्या राजू बर्डे, नितीन सुभाष जाधव व देवेंद्र बापू कदम (सर्व रा. मोकळ ओहळ) यांनी त्यांना अडवले. “तू रोज कोणाला बडबड करतो?” असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर आरोपींनी लाकडी काठी व लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यात तसेच हात-पायांवर जबर मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१), ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल झिने पुढील तपास करत आहेत.
मोकळ ओहळ येथील इसमास चौघांकडून किरकोळ वादातून लोखंडी पाईप व काठीने मारहाण, चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












