राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून तिचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात गुन्हा क्र. 1722/2020 भा.द.वि. कलम 302 व 504 अंतर्गत नोंदविण्यात आला होता. आरोपी बाबासाहेब विठ्ठल गोलवड (वय 38, रा. आंबी स्टोअर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याने त्याची पत्नी शीतल बाबासाहेब गोलवड (वय 35) हिला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून शिवीगाळ करून, लाकडी दांड्याने कपाळावर प्रहार करून तिचा खून केला होता.
या प्रकरणी आज दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय श्री. सि. एम. बागल, जिल्हा न्यायाधीश क्र. 2, अहमदनगर यांच्या न्यायालयात विशेष खटला क्र. 25/2021 मध्ये निकाल देण्यात आला. न्यायालयाने आरोपी बाबासाहेब गोलवड यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा तसेच एक हजार रुपयांचा दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याचा उत्तम तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन बागुल (नेम, राहुरी) यांनी केला असून, सरकारतर्फे खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री. घोडके यांनी पाहिले. न्यायालयीन कार्यवाहीत कोर्ट पैरवी अंमलदार पोहेकॉ. मुकतार कुरेशी, कोर्ट ड्युटी अंमलदार पोकॉ. योगेश वाघ, तसेच पोकॉ सांवत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
देवळाली प्रवरा येथील आरोपीस पत्नीच्या खुना प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाणीत झाला होता पत्नीचा मृत्यू

0Share
Leave a reply












