सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर :उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासे तालुक्यातील पाचेगाव, अमळनेर, करजगाव, निभांरी या गावांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासे तालुका अध्यक्ष अशोकराव मोरे यांनी उपस्थितांना ‘झाडे लावा, पृथ्वी हिरवीगार करा’ असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “वृक्ष हे जीवनाचा आधार असून निसर्गाचे संवर्धन हे काळाची गरज आहे. वृक्षारोपण हा पर्यावरण रक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे.”
यावेळी त्यांनी “एक झाड – एक पदाधिकारी” ही संकल्पना मांडून झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोपवली. “झाडे लावण्याइतकेच त्यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे. म्हणून प्रत्येक झाडास संरक्षणासाठी जाळी व ओळख पटवण्यासाठी फलक बसवण्यात येत आहे,” असे मोरे यांनी सांगितले.
या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासे तालुका अध्यक्ष अशोक मोरे, उपाध्यक्ष संभाजी जाधव, ओबीसी सेलचे विठ्ठलराव फुल सौंदर, गणेश गवळी, कार्याध्यक्ष अभय तूवर, युवा नेते वसंतराव कांगुणे, विक्रम तूवर, भास्कर तुवर, किशोर मोरे, शरद चव्हाण, अण्णासाहेब बाचकर, अण्णासाहेब माकोने, रामभाऊ पवार, दिनकर टेमक, नवनाथ गवळी, बजरंग रासकर, भाऊसाहेब बर्डे, मधुकर बर्डे, रमेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात पाचेगाव येथील पसायदान सामाजिक संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.
“विविध गावांमध्ये झाडे लावून, त्यांना जाळी व फलक लावून प्रत्येक झाडाचा संगोपनाची जबाबदारी एका पदाधिकाऱ्याला दिली आहे.”
— अशोकराव मोरे,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नेवासे तालुका.
नेवासे येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न, “झाडे लावा, पृथ्वी हिरवीगार करा” – अशोकराव मोरे यांचे आवाहन

0Share
Leave a reply












