शिर्डी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती, ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन, आणि लघुउद्योग विकास संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा दि. २० जून रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. प्रदीप पा. खंडापूरकर (बाबा) प्रमुख उपस्थित होते .या गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिर्डी येथील प्रसिद्ध JD महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलच्या संपादिका आणि संचालिका किरणताई जाधव यांना ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५-२६’ ने सन्मानित करण्यात आले.
किरणताई जाधव यांनी ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, सामाजिक समस्यांवरील धारधार वृत्तांकन, तसेच शासन प्रशासनाच्या त्रुटींवर बोट ठेवणारी पत्रकारिता केल्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यांच्या कार्याचा गौरव करताना, खंडापूरकर बाबा यांनी सांगितले की, “ज्यावेळी माध्यमं खरी, स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेतात, तेव्हा समाजपरिवर्तन शक्य होतं. किरणताईंचं कार्य हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे सदस्य, कार्यकर्ते, आणि स्थानिक मान्यवरांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply













