SR 24 NEWS

इतर

माळीवाडा बस स्थानक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांकडून नागरिकांना व चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला हे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे यांना निवेदन देताना संघटनेचे कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील समवेत शेख कासिम, हुसेन अत्तार, प्रकाश विधाते, इब्राहिम शेख, सचिन शिरसाठ, मतीन शेख, निलेश कांबळे, अरमान बागवान, गणेश देठे, रामेश्वर शिरसाट, अमित कानडे, पोपट कराळे, तेजस भगत, नितीन जाधव, विशाल घोरपडे, विकी भगत, शुभम सोनवणे, महेश तळेकर, जमीर शेख, कुदुस शेख आदीसह रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरामध्ये जिल्हा परिषद गेट समोरील रिक्षा स्टॉप च्या मागे काही महिला वेश्याव्यवसाय करतात वाहतुकीचा रस्ता असताना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील इशारे करतात काही प्रवाशांना लुटतात तर यांच्यासोबत असणारे व्यक्ती हे प्रवाशांना मारहाण करतात रिक्षा चालकांनी सोडवण्याचा प्रयत्न केल्यास खोट्या केस मध्ये अडकवण्याची धमकी देऊन मारहाण करतात या भीतीपोटी रिक्षाचालक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत नाही. या वेश्यांमध्ये काही महिला बांगलादेशी असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे.

माळीवाडा बस स्थानक येथे नेहमी प्रवाशांची लूटमार केली जाते माळीवाडा बस स्थानकावर बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांना तर त्या कोणत्याही परिस्थितीत लुटतातच नागरिकांना येणे जाणे मुश्किल झालेले आहे. तरी हा संपूर्ण प्रकार बंद करून सदर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व त्यांना वेश्या व्यवसायाचे काम करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!