तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी वयाच्या ९३व्या वर्षीही मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती आपली निष्ठा अधोरेखित केली. त्यांचे हे मतदान मतदारांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
अणदूर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे सभापती, राज्याचे मंत्री, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, राज्य शिखर बँकेचे अध्यक्ष, परिवहन मंत्री तसेच विधानसभेचे उपसभापती अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
मतदानानंतर बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की, लोकशाही बळकट ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या या कृतीतून लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा आदर्श संदेश समाजासमोर ठेवला गेला आहे.चव्हाण यांनी आपल्या राजकीय जीवनात जाती-पातीचे अथवा वजाबाकीचे राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण केले. स्वर्गीय सि. ना. आलूरे गुरुजी आणि मधुकरराव चव्हाण यांना संपूर्ण महाराष्ट्रात ‘राम–लक्ष्मणाची जोडी’ म्हणून ओळखले जाते, हे विशेष उल्लेखनीयaAp आहे.
वयाच्या ९३व्या वर्षीही लोकशाहीप्रती निष्ठा कायम; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

0Share
Leave a reply












