SR 24 NEWS

सामाजिक

गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाचा गणपती विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाच्यावतीने गणपती विसर्जन सोहळा भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणरायाला निरोप देताना गावातील नागरिकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजन-कीर्तनाच्या सुरात आणि वारकरी परंपरेच्या उर्जेत सहभागी होऊन संपूर्ण परिसर मंगलमय केला.

शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रथमता मिरवणुकीच्या सुरुवातीला चैतन्य वारकरी शिक्षण संस्था, जोगेश्वरी आखाडा येथील ह.भ.प. गोपीनाथ महाराज वरपे व त्त्यांच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व गोटुंबे आखाडा येथील भजनी मंडळाच्या टाळ व मृदंगाच्या आवाजात मिरवणुकीस सुरवात करण्यात आली मिरवणुकीदरम्यान लहान मुले, महिला व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत गणेश विसर्जनाला उत्साहाचे स्वरूप दिले.

या प्रसंगी डॉ. अण्णासाहेब बाचकर, जालिंदर गडधे, ह.भ.प. आदिनाथ महाराज दवणे, पत्रकार रमेश खेमनर, संतोष कराळे, सुरेंद्र आदमाने, राहुल बाचकर, अंकुश दवणे, महेंद्र मराठे, तेजस बाचकर, आकाश डहाळे, अक्षय डहाळे, राजन सुसे, तुषार सुसे, आदित्य कराळे, कार्तिक बाचकर, सोन्याबापु बाचकर, बापू होडगर, पंकज पवार, संजय धोत्रे, सिद्धार्थ सुसे, ऋतुराज शिंदे, महेंद्र मराठे, रसूल शेख, आकाश खेमनर आदींसह गावातील महिला मंडळ—रंजना दवणे, सविता गडधे, अनिता बाचकर, संगीता सुसे, रेणुका सुसे, सुनीता सुसे, शीतल दवणे, मंगल डहाळे यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागातून पारंपरिक पद्धतीने झालेला हा विसर्जन सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला. गणरायाला दिलेला हा भक्तिमय निरोप गावकऱ्यांसाठी आनंद, श्रद्धा आणि एकात्मतेचा सुंदर अनुभव ठरला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!