तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जेष्ठ पत्रकार तथा धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद तुकाराम काळुंके यांना भिम आण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . दयानंद काळुंके हे गेल्या विस वर्षांपासून शोध व सकारात्मक पत्रकारिता करीत आहेत,कोविडच्या काळात स्वतः डोक्यावर वासुदेवाची टोपी घालून वासुदेवाची वेशभूषा करुन दहा गावात कोरोनामुळे भयभीत झालेल्या लोकांना अभय देऊन कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय सांगीतले आहेच,त्याच काळात शासन आणि ग्रामीण जनता यातील दुवा होऊन पत्रकारिता केली आहे,त्यांनी उपेक्षित, वंचित समाजासाठी पत्रकारीतेतून न्याय मिळवून दिल्याने महाराष्ट्र राज्य भिम आण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती .
दि.१ मार्च रोजी वीर फकीरा साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुळजापूर येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भिम आण्णा सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सुरेश आप्पा भिसे, संघटनेचे सल्लागार अशोक जाधव,माजी नगरसेवक किशोर साठे,लहुजी शक्ती सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा प्रमुख लक्षण क्षीरसागर,भाजपाचे तुळजापूर शहरप्रमुख आनंद कंदले, सोलापूर जिल्हा लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटुळे,खडतर प्रवास दैनीकाचे संपादक प्रभाकर लोंढे,फकीरा दलाचे मराठवाडा प्रमुख सतिश कसबे,अनिलभाऊ सगट,दत्ताभाऊ कांबळे,त्र्यंबक सुर्यवंशी , सोमनाथ कांबळे,रामभाऊ कांबळे,मयुर साळुंखे यांच्या उपस्थितीत दयानंद काळुंके यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काळुंके यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जय मल्हार संघाचे चंद्रकांत हगलगुंडे, श्रीकांत अणदूर कर, चंद्रकांत गुद्द, संजीव आलूरे, शिवशंकर तिरगुळे, सचिन तोगी, शिवाजी कांबळे तसेच खडकाळी ग्रुप, 8 फार्मा ग्रुपच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
दयानंद काळुंके यांचा भिम आण्णा सामाजिक संघटनेकडून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मान

0Share
Leave a reply












