तुळजापूर प्रतिनिधी /चंद्रकांत हागलगुंडे : परिश्रम, कष्ट आणि कौशल्य यांचा जिवंत वारसा जपणाऱ्या वडार समाजाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान करत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी, उच्च पदस्थ अधिकारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये यश संपादन केलेल्या वडार समाजातील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकररावजी चव्हाण साहेब यांची होती. त्यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राज्यभरातील वडार समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मधुकररावजी चव्हाण साहेब म्हणाले, “वडार समाज हा परिश्रम, कष्ट आणि कौशल्य यांचा जिवंत वारसा जपणारा समाज आहे. दगड फोडणे, विहिरी बांधणे आणि शिल्पनिर्मिती यामधून या समाजाने महाराष्ट्राच्या बांधकाम व स्थापत्य परंपरेत ऐतिहासिक योगदान दिले आहे. त्यांच्या कष्टमय जीवनातून जिद्द, आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचे संस्कार दिसून येतात.”
ते पुढे म्हणाले, “शिक्षण व विकासापासून काही प्रमाणात दूर राहिलेला वडार समाज आज शिक्षणाच्या बळावर विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी मंत्री असताना माझ्या कार्यकाळात उपेक्षित व वंचित घटकांसाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले. विविध शिक्षण संस्थांमधून शिक्षणाचा मुख्य प्रवास सुरू केला. आज त्याचाच सकारात्मक परिणाम दिसून येत असून अणदूर येथील वडार समाज बांधव याचा लाभ घेत प्रगतीच्या वाटेवर आहेत.”
सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष गौरवचिन्ह देऊन त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. उच्च पदस्थ अधिकारी आणि नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी वडार समाज हा परंपरा, श्रमसंस्कृती आणि संघर्षशीलतेचा गौरवशाली दीपस्तंभ असल्याचे अधोरेखित करण्यात आले .
यावेळी सरपंच रामचंद्र आलूरे, डॉ. जितेंद्र कानडे, रणवीर चव्हाण, संयोजक लक्ष्मण चौगुले, मधुकर अण्णा बंदपट्टे,शंकर चौगुले, रवी शिंदे, जालिंदर मंगळवेढेकर, लक्ष्मण विटकर, बाबुराव निंबाळकर, तुकाराम चव्हाण, हरीश वडर, मारुती वीटलकर, शंकर विठ्ठलकर, शामराव विटकर, सुरज पवार, विकास माशाळ, अविनाश दांडेकर, अशोक अलकुंटे, मनोहर मधुकर, पंडित मंजुळे सह राज्यातील नवनिर्वाचित,सदस्य, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक उद्योजक लक्ष्मण चौगुले, सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे तर मधुकर आण्णा बंदपट्टे यांनी आभार मानले.
वडार समाजाच्या प्रगतीचा नवा अध्याय : शिक्षणामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात – मधुकरराव चव्हाण

0Share
Leave a reply












