राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी / जावेद शेख : राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त गावचे सुपुत्र ह.भ.प. नामदेव (महाराज) बाळासाहेब कोहकडे यांची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला.
वरवंडीच्या इतिहासात प्रथमच गावातील सुपुत्र कीर्तनकार म्हणून पुढे आल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नामदेव महाराजांच्या कीर्तन सेवेने उपस्थित भाविक भारावून गेले. त्यांच्या ओजस्वी वाणीने आणि वारकरी परंपरेवरील अभ्यासपूर्ण निरूपणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
नामदेव महाराजांना घडविण्यात आजी लक्ष्मीबाई मंज्याबापू कोहकडे, वडील बाळासाहेब कोहकडे, आई अर्चना कोहकडे, चुलते जालींदर कोहकडे, चुलती आरती कोहकडे तसेच काका अशोक कल्हापुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले आहेत.
गावकऱ्यांच्या वतीने नामदेव महाराजांचे जंगी स्वागत व भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार जावेद शेख, पत्रकार रमेश जाधव, जगदीश भालेराव, परभत बरे, सुनील पवार, सुनील भालेराव, रविंद्र भालेराव, नारायण शिंदे, अभिजित शिंदे, चेतन पवार, प्रथमेश जाधव, नवनाथ ढगे, नंदू भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
वरवंडी येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून हा पारायण सोहळा ह.भ.प. मुळे महाराज, गोरक्षनाथ ढगे, त्र्यंबक पाटील अडसुरे, शंकर ढगे, आप्पा ढगे, केशव अडसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमेश कदम, जालींदर (महाराज) अडसुरे (निवेदक), साईनाथ कदम, राजू ढगे, कैलास ढगे, विजय कदम, दिगंबर ताकटे, नितीन ढगे, ईश्वर अडसुरे आदींचे विशेष सहकार्य लाभत आहे.
नामदेव महाराज कोहकडे यांनी वारकरी संप्रदायाचे शिक्षण ज्ञानाई वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था येथे गुरुवर्य ईश्वर महाराज कदम शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. त्यांच्या कीर्तन सेवेने वरवंडी गावासह संपूर्ण पंचक्रोशी भक्तिमय वातावरणात रंगून गेली असून सप्ताह सोहळा अधिकच उत्साहात पार पडत आहे.
वरवंडीचे सुपुत्र ह.भ.प.नामदेव बाळासाहेब कोहकडे महाराज यांची अखंड हरिनाम सप्ताहात प्रभावी कीर्तन सेवा

0Share
Leave a reply













