जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : ग्रामपंचायत पातळीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानातून वितरित करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूवर देखरेख ठेवण्यासाठी अध्यक्ष,सचिव अशा अशासकीय पद असलेल्या दक्षता समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये विविध कार्यकारी सोसायटी,तीन महिला प्रतिनिधी, विरोधी पक्षाचा सदस्य, अनुसूचित जाती प्रतिनिधी, अनुसूचित जमाती प्रतिनिधी व एक सामाजिक कार्यकर्ता इत्यादींचा समावेश आहे.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथिल स्वस्त धान्य दुकान दक्षता समितीच्या अध्यक्षपदी टाकळी ढोकेश्वर येथिल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नारायण यशवंत झावरे (साहेब)तसेच गंगाधर रखमाजी बांडे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. सचिवपदी ग्राममहसूल अधिकारी व्हि एन जाधव यांची निवड झाली.
या समितीमध्ये सदस्य म्हणून टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतच्या सरपंच अरुणा प्रदिप खिलारी, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी सिताराम खिलारी, पत्रकार वसंत भानुदास रांधवण, सामाजिक कार्यकर्ते संजय शिवाजी झावरे, महिला प्रतिनिधी, माजी ग्रामपंचायत सदस्या चित्रा संतोष बांडे, ग्रामपंचायत सदस्या सुग्राबी कादर हवालदार, अनुसूचित मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून शिला आनंदा आल्हाट, स्वस्त धान्य दुकानाचे सेल्समन विलास गुलाब नाईकवाडी यांची सेवा सोसायटीच्या वतीने ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
Leave a reply













