आरडगाव ( राहुरी) / सोमनाथ वाघ : राहुरी तालुक्यातील आरडगावच्या उपसरपंचपदी संगीता नंदकुमार तांबे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच नीलेश जगधने यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठी सरपंच सुरेखा रवींद्र म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांच्या बैठकीत ही निवडप्रक्रिया ग्रामपंचायत अधिकारी घाडगे यांनी पार पाडली. संगीता तांबे यांच्या नावाची सूचना सचिन खुरुद यांनी मांडली. यावेळी सदस्य उत्तम रावसाहेब वने, निलेश जगधने, सुरेंद्र जाधव, मंदाबाई दिलीप म्हसे, स्वाती किशोर गागरे, मनीषा ज्ञानदेव जाधव, सुमन, राजेंद्र जाधव, लीलाबाई झुगे, पल्लवी काळे उपस्थित होते. निवडीनंतर तांबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी वने, गोविंद म्हसे, केशव म्हसे, रवींद्र म्हसे, दत्तात्रय काळे, अशोक काळे, इंद्रभान झुगे, दिलीप म्हसे, सुरेश झुगे, बापूसाहेब धसाळ, चंद्रकांत म्हसे, नंदकुमार तांबे, मयूर धसाळ, सोपान झुगे, पाटील साहेब काळे, नितीन काळे, ज्ञानेश्वर काळे, प्रमोद झुगे, भाऊसाहेब जाधव, सागर देशमुख, सुदर्शन म्हसे, राजेंद्र जाधव, अमोल म्हसे, सतीश धसाळ, मारुती झुगे, ग्रामपंचायत अधिकारी घाडगे भाऊसाहेब, दत्तात्रय म्हसे, प्रकाश भांड, सचिन झुगे, संदीप जेऊघाले आदी उपस्थित होते.
Leave a reply













