राहुरी प्रतिनिधी : रविवार दिनांक ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने महाराष्ट्रात वातावरण भक्तीमय झाले आहे. राहुरी शहरातील हरिहर किड्स स्कूलच्या चिमुकल्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर शनिवारी आषाढी एकादशी निमित्त शिस्तबद्ध दिंडी काढली होती.
ज्ञानेश्वर माऊलींच्या गजर डोक्यावर तुळशी वृंदावन हाती दिंड्या पताका घेतलेले चिमुकले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांचा आकर्षण पेहराव केला होता. जय जय राम कृष्ण हरी,विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम आशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दिंडी झाल्यावर स्कूलमध्ये चिमुकल्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिया गुमास्ते यांनी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे पूजन करून आरती केली. शाळेच्या मार्गदर्शिका सौ.मिनावाहिनी गुमास्ते यांच्या हस्ते चिमुकल्यांना आणि पालकांना फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षिका वैशाली शिंदे, नम्रता शिर्के, यास्मिन शेख, गीता अवसरकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुरेखा तारटे आणि अलका उंडे आदींनी मेहनत घेतली.
Leave a reply













