SR 24 NEWS

शिक्षण विषयी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासात सदुपयोग करा – श्रीमती छायाताई फिरोदिया, श्री साईनाथ विद्यालयात 69वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी : अहिल्यानगर एज्युकेशन सोसायटीच्या श्री साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ६९ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि. २२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अहिल्यानगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आभासी दुनियेत अडकून न राहता आपल्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने मेहनत घ्यावी. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी सकारात्मक आणि उपयुक्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अहिल्यानगरचे प्रकल्प संचालक मा. श्री धनेश स्वामी हे होते. योग्य संस्कार, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. शाळा समितीचे को-चेअरमन मनोज लोढा यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त पाळावी, तसेच पालकांनी पालकसभांना नियमित उपस्थित राहून शाळेशी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

 

याप्रसंगी मा. श्रीमती सुनिता मुथा, मा. पुष्पा फिरोदिया, आशाताई फिरोदिया (सदस्य, सल्लागार मंडळ), गौरव मिरीकर (विश्वस्त – अ. ए. सोसायटी) आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. शाळेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील जवळपास १०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम, सन्मानचिन्ह व संस्थेकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेखा आघाव, सौ. घनकुटे, श्रीमती आमकर व श्री ठाकरे यांनी केले. पारितोषिक यादी वाचन प्रा. श्री संतोष गोर्डे व श्रीमती घोगरे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री मनोहर लांगी व सौ. हांडे यांची निवड करण्यात आली होती. उच्च माध्यमिक विभागातून चिरंजीव आकाश गायकवाड व कुमारी साक्षी त्रिभुवन यांची आदर्श विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी भव्य परेड सादर करून मानवंदना दिली. कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री अभिमन्यू डुबल, उपमुख्याध्यापिका सौ. वनिता बोराडे, पर्यवेक्षक शंकर बेलदार व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रा. सौ. आगलावे यांचे मार्गदर्शन लाभले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजू कुसमुडे, श्री जाधव एन. पी., श्री संजय तमनर, श्री पंडित, श्री कोबरणे, श्री शेख, सौ. शेळके, श्रीमती विटणकर, श्री किशोर दळवी, सौ. कोळपकर, श्री हातागळे, श्री खटके, श्री पिपाडा आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!