श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून तिची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास खानापूर ते महांकाळवडगाव रस्त्यावर म्हसोबा मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. विना नंबरचा निळ्या रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर (चेसी नं. JZCSJ 121466553) गोदावरी नदीपात्रातून एक ब्रास वाळू भरून बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक शशिकांत गाढे (नेमणूक – अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून अर्शद इसाक शेख (रा. खानापूर) व एका अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सदर कारवाईत ५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व १० हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/१५ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ एस. एस. पवार करत आहेत.
गोदावरी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; श्रीरामपूर तालुका पोलिसांची कारवाई

0Share
Leave a reply












