SR 24 NEWS

सामाजिक

“समाज जर एकत्रित असेल तर समाजाची प्रगती होत असते.”.. नगरसेवक दिपक ( बाळा) तावडे.

Spread the love

मुंबई कांदिवली पश्चिम / भारत कवितके : समाज जर एकत्रित असेल तरच समाजाची प्रगती होत असते, असे प्रतिपादन उत्तर मुंबई भाजपा अध्यक्ष आणि वार्ड क्रमांक २० चे नगरसेवक बाळा तावडे यांनी झुंजार धनगर समाज संस्थेच्या स्नेहसंमेलन प्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले, रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शुभम पार्टी हॉल गणेश चौक चारकोप कांदिवली पश्चिम या ठिकाणी आयोजित केलेल्या समस्त धनगर समाज बांधवांच्या स्नेहसंमेलन व इतर विविध कार्यक्रमा प्रसंगी सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मल्हाराव होळकर, यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.ते पुढे म्हणाले की ” कांदिवली पश्चिम मध्ये धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात राहतात, त्यामध्ये काही भाजपाचे पदाधिकारी ही आहेत, नुकत्याच झालेल्या मनपाच्या निवडणुकीत या समाज बांधवांनी मला निवडून आणण्यासाठी सहकार्य केले आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांचे कार्य लोककल्याणकारी मानवतावादी आहे, त्यांना या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो, समाजाच्या कोणत्याही मागणी साठी समाजाने एकत्र राहून, सातत्याने पाठपुरावा करून समाज उपयोगी गोष्टी पदरात पाडून घ्याव्यात,” या प्रसंगी भाजपाचे श्रीकांत कवठणकर,योगेश पडवळ, प्रमोद गुर्जर, गिरीधर साळुंखे, डॉ, कालेलकर, सुजाता बाईसाहेब होळकर, ऋतू गंधा बारगळ,आदि मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले,

महिलांनी सादर केलेला लेझीम, लावणी नृत्य,व मंगळागौरी कार्यक्रमात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता, समाजातील ज्येष्ठ समाज बांधवांचे सत्कार करण्यात आले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कार्यकारिणी आणि सल्लागार मंडळाने विशेष परिश्रम घेतले, शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद उपस्थितीत समाज बांधवांनी घेतला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!