भारत कवितके / मुंबई कांदिवली पश्चिम : मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची ‘ अंगा अंगावर फुटलाय काटा…’ ही थंडीची रसभरित शृंगारिक लावणी नुकतीच युट्यूबवर प्रसारित झाली असून रसिकांचा लावणीला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते आहे,ए.आय.म्युझिक सिंगर व्दारा लावणीला साजेसे असे संगीत संगीतकार प्रमोद सूर्यवंशी यांचे लाभले आहे, थंडीच्या वातावरणात एका एकट्या तरुणीची शारीरिक व मानसिक अवस्था सुरेख, मार्मिक, शब्दात कवी भारत कवितके यांनी मांडली आहे.तर स्पष्ट,मधुर,गोड,रसाळ, लाडिक लावणीला साजेच्या स्त्रीच्या आवाजाने लावणी खुलली आहे.
थंडीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी घरात एकटीच तरुणी असताना आपली स्थिती लावणी तून कथन करते आहे.’ सख्या सजणा अहो राया या वंगाळ सुटलेल्या थंडीमुळे माझ्या अंगा अंगावर काटा फुटलाय, या थंडीमुळे माझ्या एकट्या असलेल्या मनाला चैन पडेना, या थंडीत मला कुठेही उबदारपणा मिळत नाही, उबदारपणा पणा मिळावा म्हणून माझा तरणाताठा जीव झुरतो आहे, घरातील दिव्याची वात कमी करून मी माझ्याच सर्वांगा वरुन हात फिरवून थंडी कमी करण्याचा प्रयत्न करते, अशा वेळी माझ्या चोळीची शिलाई मात्र तटातटा उसवते,असा वंगाळ गारठा जाणवत आहे.घराचे दार, खिडक्या बंद करून घेतल्या, माझ्या हट्टी मनाला बंधने घातली, मनात होणाऱ्या चलबिचलला बंधने घातली, मनाला बजावत रहिले, तरी ही बेभान झालेला गारठा माझ्या अंगाला झोंबतो आहे.’
अंगा अंगावर……
अंगा अंगावर फुटलाय काटा,
लय वंगाळ सुटलाय गारठा//०//
चैन पडेना या एकल्या मना,
मिळेना बाई कुठेच उबदारपणा,
झुरतो जीव माझा तरणाताठा//१//
लय वंगाळ…….
मंद करूनी दिव्याची वात,
अंगावरती किती फिरवू हात?
शिलाई चोळीची उसवते तटा तटा//२//
लय वंगाळ…….
दार खिडक्या लाऊन घेतली.
हट्टी मनाला बंधने घातली.
बेभान होऊन झोंबतो गारठा//३//
लय वंगाळ…..
अंगा अंगावर फुटलाय काटा,
लय वंगाळ सुटलाय गारठा//
सख्या सजणा, अहो राया…….











