नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व स्वच्छ सुंदर शहरासाठी मतदारांनी माजी मुख्यमंत्री व भूमिपुत्र खासदार अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करावेत, ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी असून नाले रस्ते भूमिगत गटारे उड्डाणपूलांच्या निर्मितीसाठी, ट्राफिक मुक्त शहरांसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करावेत असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहेत.
नांदेड महापालिकेच्या निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून अनेक पक्ष महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभा टाकले आहेत. भारतीय जनता पक्ष वगळता इतर पक्षाला उमेदवार सुद्धा भेटले नाहीत. अशा पक्षातील नेते मंडळी नांदेड शहराला काय नेतृत्व देणार असा प्रश्न बच्चेवार यांनी उपस्थित करुन शहराच्या विकासासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. या सर्व गोष्टींचा नांदेडकर नक्कीच विचार करणार आहेत. शहरातील रस्ते, आरोग्य सेवा, चांगले शिक्षण, रेल्वे कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटीसाठी भाजपाला मतदान करणे आवश्यक आहे. नांदेड शहरातील सर्व प्रभागांतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून शहराच्या विकासासाठी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचा विकास होत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा विकास आदरणीय देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. नांदेडचा विकास आपल्याला नांदेडची भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या विकासाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे एक सुसंस्कृत विश्वासार्ह, उच्च विद्या विभूषित माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हातात द्यावीत असे आव्हान भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
Leave a reply













