राहुरी (प्रतिनिधी): दिनांक ३० जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता राहुरी येथील एका अल्पवयीन मुलीने कोणालाही न सांगता घर सोडले. याबाबत तिच्या आईने अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून गु.र.नं. ८३०/२०२५ प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गोपनीय माहितीच्या आधारे आज पोलिसांनी शोधमोहीम राबवून सदर पीडित मुलगी शोधून काढली. मुलगी सुखरूप मिळाल्यानंतर तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.
विशेष म्हणजे, राहुरी पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत गेल्या वर्षभरात एकूण ७४ अपहरित मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त केले आहे. अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणात मदत करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोउनि समाधान फडोळ, पोहेकॉ संजय राठोड, पोहेकॉ बबन राठोड, पोहेकॉ झिने, पोना सुनिल निकम व पोकॉ रविंद्र कांबळे यांच्या पथकाने केली.
Leave a reply













