सटाणा प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल सटाणा येथील इ.०१ ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल (वनभोजन) व वृक्षारोपण बागलाण तालुक्यातील सर्वात उंचीवर असलेले गाव भवाडे येथे नेण्यात आली. निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कडेला, विद्यार्थ्यांनी कडुलिंब, आंबा, वड, बेल,शिसव, लिंबू, जास्वंद यासारख्या अनेक वृक्षांचे रोपण केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व व त्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
शैक्षणिक सहलीचे संपूर्ण नियोजन शाळेचे उपशिक्षक श्री विनय सोनवणे यांनी केले विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी प्रेम निर्माण करून निसर्गातील कार्यकलाप ओळखता यावे याविषयी मार्गदर्शन त्यांनी केले.
भवाडे येथे उज्जैनच्या जंगली बाबा यांच्या समाधी स्थळी जाऊन विद्यार्थ्यांनी बाबांनी केलेल्या तपसाधनेची माहिती जाणून घेतली, विद्यार्थ्यांनी अनेक खेळ देखील खेळले, निसर्गाचा आनंद घेत, निसर्ग अभ्यास केला. अतिशय खेळीमेळच्या व शिस्तबद्ध वातावरणात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला विद्यार्थ्यांन समवेत शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शैक्षणिक सहलीच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे सरचिटणीस मा. श्री नितीनजी ठाकरे साहेब, चिटणीस दिलीप (भाऊसा) दळवी, बागलाण तालुका संचालक डॉ. प्रसाद दादा सोनवणे, महिला संचालिका श्रीम, शालनताई सोनवणे, शालेय समिती अध्यक्ष सुनील दादा सोनवणे सर्व सभासद, कार्यकारणी मंडळ सर्वांनी उपक्रमाचे कौतुक केले.
Leave a reply













