SR 24 NEWS

सामाजिक

जवाहरच्या मकरंद पाटील यांना डॉ. सी. व्ही. रमन जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी /चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मकरंद पाटील यांना डॉ. सी. व्ही. रमन यांच्या नावाने दिला जाणारा “डॉ. सी. व्ही. रमन जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

मकरंद पाटील हे १९९३ पासून जवाहर विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शाळा स्तरापासून जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनांपर्यंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे.केवळ पाठ्यपुस्तकापुरते ज्ञान मर्यादित न ठेवता विविध प्रयोग, प्रात्यक्षिके आणि उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञान शिकवण्याची त्यांची पद्धत विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विज्ञान शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच ते एनसीसी कमांडर म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्वगुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.या यशाबद्दल संस्थेचे सचिव रामचंद्र आलूरे, लक्ष्मीकांत पाटील, नागनाथ कानडे, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी तसेच जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!