तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर पंचायत समिती सभापती पदी काटी गणातील विक्रम सिंह देशमुख यांची तर उपसभापतीपदी नंदगाव गणातील सिदगावच्या सुकन्या सौ. रोहिणी निलगिरी यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.संपूर्ण जिल्ह्यात गाजावाजा झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत बराच तर्क-वितर्क काढले जात होते.
राजकारणातील चाणक्य व किंग मेकर यांचा अंदाज या निवडणुकीत अयशस्वी ठरला. त्यामुळे अणदूर करांच्या नशिबी मात्र निव्वळ निराशा पहावयास मिळाल्याने जानकरातून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.अणदूर गणातून सभापती पदाचा उमेदवार म्हणून रणवीर चव्हाण यांचा चेहरा मतदार समोर उभा केला गेला होता. मतदारांनी ही भरघोस मतानी विजय सलामी दिली. हे वास्तव खरे असले तरी ऐनवेळी सभापती पद नाकारल्याने मतदारात निराशा पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषद गटातून दीपक दादा आलूरे यांचा अवघ्या निसटत्या मतानी अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना सहन करावा लागला हे मात्र ना करता येणार नाही. किमान पंचायत समितीला तरी सभापती पदाची वर्णी निश्चित लागेल असा विश्वास ग्रामस्थ विशेषतः चव्हाण कार्यकर्त्यांना होती. मात्र अखेरच्या क्षणी तूप ही गेले अन्न मापही गेले अशी केविलवाणी अवस्था मतदारांची झाली. हे मात्र उणीव भरून निघणे अशक्यच म्हणावे लागेल अशी भावना सर्वसामान्य मतदानातून ऐकावयास मिळत आहे.
तुळजापूर पंचायत समिती सभापतीपदी विक्रमसिंह देशमुख तर उपसभापतीपदी सौ. रोहिणी निलगिरी यांची निवड..!

0Share
Leave a reply












