SR 24 NEWS

सामाजिक

तमनर आखाडा येथे धुळेश्वर मित्र मंडळाचा गणेश विसर्जन सोहळा पारंपरिक व भक्तिमय वातावरणात संपन्न”

Spread the love

राहुरी प्रतिनिधी :  राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील धुळेश्वर मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे पारंपारिक पद्धतीने टाळ-मृदुंग, भजनांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीत गावातील नागरिक, भजनी मंडळे तसेच पैठण भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. टाळ, मृदुंग, टाळशाखी व भजनाच्या गजरात मिरवणुकीची सुरुवात झाली. गावातील महिला-पुरुष, लहान मुले, तरुण व ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा संगम झालेल्या या मिरवणुकीत गणरायाला निरोप देताना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता.

या सोहळ्याचे आयोजन धुळेश्वर मित्र मंडळाचे सदस्य – सचिन पोपट बाचकर, सचिन शांताराम तमनर, गोविंद मच्छिंद्र भिसे, प्रफुल बाळासाहेब तमनर, अमोल देवका तमनर, किशोर सोन्याबापु कुदनर, किरण शांताराम तमनर, राजू भाऊसाहेब तमनर, नवनाथ देवका तमनर, रामा जिजाबा तमनर, सतीश सोन्याबापू तमनर, सतीश भाऊसाहेब तमनर, साई आप्पासाहेब तमनर, शरद नाना तमनर, आदेश सुरेश तमनर, किरण भारत तमनर, किशोर कारभारी तमनर, रुद्राक्ष नवनाथ तमनर, सक्षम सिताराम तमनर, सचिन रामभाऊ तमनर, अजय रावसाहेब तमनर, अविनाश शांताराम तमनर, देवराम भागवत तमनर, सोहम भाऊसाहेब तमनर, रवी नाना तमनर, कृष्णा भास्कर तमनर यांनी मनापासून योगदान देऊन यशस्वी केले.

मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक रावसाहेब बाबुराव तमनर, शांताराम दादाराम तमनर, आप्पासाहेब हरिभाऊ तमनर, भरत सतूबा तमनर, भास्कर बाबुराव तमनर व सुरेश पांडुरंग तमनर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम पारंपारिक पद्धतीने पार पडला.

टाळ-मृदुंग व भजनांच्या गजराने भारावलेल्या या विसर्जन मिरवणुकीमुळे गावकऱ्यांच्या मनावर एक अविस्मरणीय ठसा उमटला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!