SR 24 NEWS

इतर

राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात पती-पत्नीच्या किरकोळ वादातून निराश पतीची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) १७ सप्टेंबर  : पती-पत्नीतील किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून निराश झालेल्या पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार (दि. १६) रोजी सकाळी आठच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात घडली.

गणेश शिवाजी अदमाने (वय ३४, रा. उरुळी देवाची, ता. हवेली, पुणे) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश अदमाने हा काही दिवसांपासून गुहा येथील साई सुंदर हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. पत्नी व मुलांसह तो हॉटेल मागील खोलीत वास्तव्यास होता.

सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पत्नी घराबाहेर निघून गेल्यानंतर निराश झालेल्या गणेश अदमाने याने हॉटेलमागील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना समोर आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेतली. रवींद्र देवगीरे यांनी रुग्णवाहिकेतून गणेश यास राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.मयत गणेश अदमाने याच्यामागे आई, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. घटनेची नोंद राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!