राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी शहरातील मानाचा गणपती म्हणून ख्याती असलेल्या आझाद गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ शनिवारी दुपारी मोठ्या थाटामाटात करण्यात आला. तहसीलदार श्री. नामदेव पाटील यांच्या हस्ते फीत कापून व गणपती बाप्पाची आरती करून मिरवणुकीची सुरुवात झाली.
या वेळी श्रीरामपूर पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. भवर, राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. संजय ठेंगे, अँड. राहुलभैय्या शेटे तसेच आझाद गणेश मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात मिरवणूक पुढे सरकली.
मिरवणुकीदरम्यान शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण मिरवणूक उत्साह, भक्तीभाव आणि शांततेत पार पडली. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली.
याचबरोबर छत्रपती चौकातील अष्टओंकार गणेश मंडळाच्या गणपतीचेही विधिवत पूजा-अर्चा करून पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी मंडळाचे नवे-जुने सदस्य उपस्थित राहून बाप्पाला निरोप देताना भावुक झाले.
राहुरीतील आझाद गणेश मंडळाचा मानाचा गणपती दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गणेश भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात गणेशोत्सवाची परंपरा आणि सामूहिकतेचा अनोखा उत्साह अनुभवायला मिळाला.
राहुरी शहरातील मानाच्या गणपती आझाद मंडळाच्या विसर्जन मिरवणुक उत्साहात संपन्न, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते ‘आझाद गणेश मंडळा’च्या मिरवणुकीचा शुभारंभ

0Share
Leave a reply













