राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील मानोरी गावात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका मुलाने स्वतःच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बाबासाहेब शांतवन मकासरे (वय ६१ वर्षे, रा. मानोरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा राहुल बाबासाहेब मकासरे याला दारू पिण्याची सवय आहे. दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे आठ वाजता बाबासाहेब मकासरे व पत्नी हिराबाई घरी असताना राहुल हा दारू पिऊन घरी आला. घरात आल्यानंतर त्याने आई-वडिलांना कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वडिलांनी त्याला समजावले की, “दारू पिऊन आला आहेस, आता परत पैसे मागू नकोस, दारू पिणे सोड.” मात्र, हे बोलणे त्याच्या जिव्हाळ्याला लागल्याने त्याने संतापून आई-वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. एवढेच नव्हे, तर “दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर पीडित वडील बाबासाहेब मकासरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी राहुल बाबासाहेब मकासरे, रा. मानोरी याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नं. ९४६/२०२५ भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण असून मुलानेच आई-वडिलांवर हात उचलल्यामुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाकडून आई-वडिलांना मारहाण, मानोरीतील संतापजनक घटना; राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












