सोमनाथ वाघ / मानोरी (राहुरी) : मानोरी ग्रामपंचायतची बंद असलेली व्यायामशाळा (तालीम) पुन्हा खुली करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी दिनांक १ ऑगस्ट रोजी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनावर गावातील विविध मान्यवरांनी सह्या करत व्यायामशाळा १५ दिवसांत खुली न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत मालकीची तालीम सध्या बंद असून, ती पुन्हा सुरू करण्याची मागणी यापूर्वीही दोन वेळा — दिनांक २३ जून २०२५ आणि ८ जुलै २०२५ रोजी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. तसेच दिनांक २६ मे २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेतही ऐनवेळच्या विषयात हीच मागणी मांडण्यात आली होती.
सदर तालीम ग्रामपंचायत मालकीच्या मालमत्ता क्रमांक १४ मध्ये असून तिच्यावर ग्रामपंचायतीचे पूर्ण अधिकार आहेत. या ठिकाणी काही अतिक्रमणकर्त्यांनी बेकायदेशीरपणे शिरकाव केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ही जागा पूर्वीपासून व्यायामासाठी वापरली जात असून ती पूर्ववत ग्रामस्थांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
या निवेदनावर उपसभापती रविंद्र आढाव, उपसरपंच प्रतिनिधी अमोल भिंगारे, अँड. संजय पवार, सदस्य दादासाहेब आढाव, भाऊसाहेब आढाव, माजी सरपंच तुकाराम साळुंके, सोसायटी संचालक भास्कर भिंगारे, एकनाथ थोरात, संजय डोंगरे, सचिन मकासरे, पोपट जाधव आणि नारायण शाहू आढाव यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी स्वाक्षरी केली आहे.
मानोरीतील व्यायामशाळा त्वरित खुली करा ग्रामस्थांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी, १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

0Share
Leave a reply












