नांदेड प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी तीन दिवसात बिलोली, देगलूर , धर्माबाद या तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या असून धर्माबाद येथील रत्नाळी मध्ये रात्री बारा वाजता अतिवृष्टी ग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी रत्नाळी आणि धर्माबाद परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना महत्त्व देत प्राथमिक अडचणी सोडवण्यात आल्या. मध्यरात्री घेण्यात आलेल्या भेटीगाठींमुळे खा. डॉ.अजित गोपछडे हे जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र तयार असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर ,बिलोली, धर्माबाद, नायगाव, मुखेड आदी तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घराची पडझड झाली, ज्यांचा रोजगार बुडाला, खाण्यापिण्याचे प्रश्न निर्माण झाले. अशा नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी या तिन्ही तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या आहेत. प्रत्येक गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . पुरामुळे शेती उध्वस्त झाल्याने राज्य आणि केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी शेतकरी, व्यापारी, आणि नागरिकांना आश्वासित केले. हा भेटीचा दौरा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे रात्नाळी येथील नियोजित दौऱ्याला उशीर होणार होता. तरीही आपल्या जनतेशी आपण भेटलेच पाहिजे या हेतूने रत्नाळी येथील नागरिकांशी हितगुज करण्यासाठी त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मध्यरात्री बारा वाजता त्यांनी भेट दिली . रात्रीच्या बारा वाजताही शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी स्वाती दाभाडे ( उपविभागीय अधिकारी ) सुरेखा स्वामी (तहसीलदार) कस्तुभ गव्हाणे ( मुख्याधिकारी नगरपालिका धर्माबाद ) विवेक गुडपे (कृषी अधिकारी धर्माबाद)रवी श्रीसागर (गटविकास अधिकारी) प्रकाश नागरगोजे (अभियंता नगरपरिषद, धर्माबाद) महादेव लोणीकर (पोलीस उपनिरीक्षक) कुलकर्णी (मंडळ अधिकारी) गाजेवार (तलाठी) यांच्यासह विशेषतः महिला अधिकारीही या बैठकीला उपस्थित होत्या . अन्नधान्य , पंचनामे , वीज ही स्थानिक पातळीवरची प्रश्न जगावरच सोडविण्यात आली. भविष्यातही धर्माबाद तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नागरिकांनी मनात कोणताही संकोच न ठेवता आपल्या अडचणी कोणत्याही माध्यमातून आमच्या ध्यानात आणाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे असा विश्वासही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी यावेळी दिला.
खा. डॉ.अजित गोपछडेंनी मध्यरात्री धर्माबादेत जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा : प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत सोडवले अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न

0Share
Leave a reply












