SR 24 NEWS

शिक्षण विषयी

देशपातळीवरील अबॅकस स्पर्धेत प्रतिक चव्हाण व अर्जुन शिंदे देशात प्रथम, शास्त्रीय दृष्टिकोनातून अबॅकस मुलांच्या बौद्धिक क्षमतेस चालना देते – डॉ.विक्रम जांभळे

Spread the love

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – नॉव्हेल अबॅकस अकॅडमी, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशपातळीवरील अबॅकस स्पर्धेत अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत धानोरा केंद्रातील कनिष्ठ गटातील प्रतिक चव्हाण व वरिष्ठ गटातील हैद्राबाद केंद्रातील पुणेस्थित अर्जुन शिंदे यांनी ‘चॅम्पियन ऑफ ऑल चॅम्पियन्स’ हा सर्वोच्च बहुमान पटकावला.

स्पर्धा ऑनलाईन व ऑफलाइन स्वरूपात घेण्यात आली. परीक्षेसाठी १० मिनिटांत १०० गणिते सोडवण्याचे आव्हान होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चॅम्पियन, विनर, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे परदेशातील विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन माध्यमातून या परीक्षेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सचिन सदाफळ होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अबॅकसचे महत्त्व अधोरेखित केले. नॉव्हेल अबॅकस अकॅडमी संचालिका सौ. ज्योती विक्रम जांभळे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत संस्थेच्या गेल्या १९ वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. डॉ. विक्रम जांभळे यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून अबॅकस कसे मुलांच्या बौद्धिक क्षमतेस चालना देते, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अंकगणितातील कौशल्य, एकाग्रता, स्मरणशक्ती व मेंदूची कार्यक्षमता कशी वाढते, याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

तसेच श्री. संजय भापकर यांनी देखील आजच्या स्पर्धात्मक युगात अबॅकसद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधता येतो, याबाबत पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, नॉव्हेल अकॅडमीच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!