SR 24 NEWS

सामाजिक

राज्यस्तरीय पोलीस स्पर्धेत मानोरीच्या कु. शुभांगी बाचकर हिचा गोळीबार प्रकारात प्रथम क्रमांक, मुंबई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मान ; मानोरी ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Spread the love

मानोरी प्रतिनिधी : मानोरी येथील प्रगतशील शेतकरी मल्हारी अनाजी बाचकर यांची सुकन्या कु. शुभांगी मल्हारी बाचकर हिने राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत गोळीबार प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सध्या ती महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल कु. शुभांगी बाचकर हिचा सन्मान मुंबईचे पोलीस आयुक्त मान. कृष्णप्रकाश यांच्या हस्ते करण्यात आला. तिच्या या यशामुळे मानोरी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कु. शुभांगी बाचकर हिचे मानोरी ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. तसेच लोकनियुक्त सरपंच ताराबाई वाघ, मानोरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शरदराव पोटे, माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन उत्तमराव खुळे, भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव तोडमल, कारखान्याचे माजी संचालक निवृत्ती नाना आढाव, माजी संचालक उत्तमराव आढाव, युवा नेते पोपटराव पोटे, युवा नेते बापूसाहेब वाघ, उपसरपंच एकनाथ आढाव, माजी उपसरपंच अण्णासाहेब तोडमल माजी उपसरपंच शिवाजी थोरात, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब ठुबे, पोपटराव आढाव सर, आदिनाथ गुंजाळ, पै.संजय डोंगरे यांनी कु. शुभांगी बाचकर हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!