SR 24 NEWS

सामाजिक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,धाराशिव जिल्हा कार्यकारणीवर रामचंद्र आलूरे यांची निवड-सर्वत्र अभिनंदन..!

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई सर्वोत्तम सेवा संघ असून धाराशिव जिल्हा कार्यकारिणीवर अणदूचे सरपंच रामचंद्र आलूरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.या संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपाध्यक्ष अरुण गुजराती, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, सरचिटणीस हेमंत टकले, कोषाध्यक्ष आदिती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा कारभार चालतो.

नुकतीच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई विश्वस्त मंडळाची बैठक होऊन धाराशिव जिल्हा केंद्राची नवीन कार्यकारिणी मंडळास मान्यता देण्यात आली. धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष जीवनराव गोरे, उपाध्यक्ष डॉक्टर जयसिंगराव देशमुख, सचिव रमेश दापके, कोषाध्यक्ष डॉक्टर अविनाश तांबारे, सदस्य आदित्य गोरे, सौ. सुरेखा जगदाळे, श्रीमती सय्यद, श्रीमती आशाताई मोरजकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!