विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील आदर्श गाव टाकळी ढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रोउत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि.२१ मार्च ते २४ मार्च दरम्यान होणाऱ्या या यात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक, मनोरंजनाचे अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी फकीर शहावाली बाबांचा संदल कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात दारूगोळ्याची आतषबाजी करण्यात येणार आहे. तसेच परंपरेनुसार रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी बनाईदेवी यात्रेनिमित्त सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक रात्री ७.३० वा. भव्य छबिना मिरवणूक आतिषबाजी आणि रात्री १० वा. नामवंत तमाशा कलावंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे करवडीकर या मराठमोळ्या तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केले असून सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी मळगंगा देवीची सकाळी ८.३० वा. काठी मिरवणूक दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा, भरविण्यात येणार आहे. रात्री ७.३० वा. भव्य छबिना पालखी मिरवणूक, रात्री १० वा. नामवंत लावणी कलाकार शबनम पुणेकर यांचा फुलवंती ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर मंगळवार,दि.२४ मार्च २०२६ रोजी मुक्ताई देवीची सकाळी ८ वा. काठी मिरवणूक मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रात्री ८ वा. भव्य छबिना मिरवणूक रात्री १० वा. अमर पुणेकर प्रस्तुत नटखट सुंदरा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमाने या ४ दिवसीय यात्रेची सांगता होते. या यात्रोउत्सवात दररोज भव्य मिरवणुकीसाठी मुख्य पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा सनई पथक व ब्रास बँड खास आकर्षण असणार आहे. यात्रोत्सव असल्या कारणाने गावातील मुख्य प्रवेशद्वारावर तसेच संपूर्ण मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्याचे कामे अंतिम टप्प्यात आले आहेत. परिसरातील भाविकांनी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन बनाईदेवी यात्रा कमेटी व यात्रा उत्सव कमेटीचे अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी (मेजर), बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार वसंत रांधवण,विवेक (सोन्या) धुमाळ, प्रशांत झावरे, अंकुश पायमोडे, मळिभाऊ रांधवण, विक्रम झावरे, नितीन खोडदे, नितीन बांडे,केबी बांडे,विकास आल्हाट व टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
टाकळी ढोकेश्वर येथिल बनाई देवी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या विविध धार्मिक व इतर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या सूचनेनुसार यात्रोत्सवाकरीता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. यात्रा उत्सव दरम्यान, हुल्लडबाजी करणाऱ्यांसह भुरट्या चोरांवर नजर ठेवण्याची सूचना पथकाला करण्यात आली आहे.
टाकळीढोकेश्वर येथिल बनाई देवी यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

0Share
Leave a reply












