SR 24 NEWS

इतर

काडाळा येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न

Spread the love

नायगाव प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नायगाव तालुक्यातील काडाळा येथे आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरामध्ये तब्बल १२० नागरिक, माता बंघिनिचि व ५५ जनाचि नेत्र तपासनि केलि असता २२ मोतिबिंदु शस्त्रक्रियासाठि पात्र ठरले आहेत यांचि मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांच्यावर नांदेड येथे लवकरच मोतिबिंदु शस्रक्रिया करन्यात येनार आहे.

या शिबिरामध्ये हृदयरोग, किडनी विकार, मधुमेह, कर्करोग, थायरॉईड, रक्तदाब तसेच इतर गंभीर आजारांबाबत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माहिती देण्यात आली.

नांदेड येथील श्री गुरूजी डाॅ. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुशिल राठी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ. शेखर चौधरी, अवधुत भाबळे, सूरेश पा. शिदे. सरूस्वति राठोड, श्रध्दा अवधुतवार, वैष्णवि घोरपडे व लाॅयन्स नेत्र रूग्णालय जगमवाडिचे डाॅ. कृष्णा मेडेवार व त्यांचि टिम व माजरम प्रार्थमिक आरोग्य केद्राचे वैद्यकिय अधिकारि पाटिल साहेब याचि टिम यामध्ये व्हि. बि. राठोड आरोग्य साह्यक , एस. के. स्वामी आरोग्य सेवक, हर्षवाड मॅडम आरोग्य सेविका, धिरज शिदे, मंगलाताई वाघमारे आशा वर्कर, गंगाबाई जाधव, शोभाबाई जाधव अगनवाडि कार्यकर्त्या यांचा सहभाग होता. डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक उपचार व पुढील मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये जेष्ठ नागरिकासाठि व महिलासाठि मोफत ECG, व ईतर आजाराचि तपासनि करन्यात आलि. हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय काडाळा येथे आयोजित करण्यात आले होते. काडाळा ग्रामपंचायतच्या वतिने सर्व डाॅक्टाराच्या टिमचे व आयोजक अवकाश पाटिल याचे स्वागत करन्यात आले. व शिबिराचे आयोजक अवकाश पाटिल धुप्पेकर यांच्या वतीने डॉक्टरांच्या टीमचे व सरपंच, पो. पाटिल, पत्रकार, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते व ऊपस्थित मान्यवराचे स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात अवकाश पाटील धुप्पेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत अशाच प्रकारचे मोफत आरोग्य शिबिर भविष्यातही राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या शिबिरामध्ये ऊपस्थित रमेश पा. जाधव सरपंच, मारोति ईरेवाड पो. पाटिल, पत्रकार गणेश कंदुर्के, परमेश्वर पाटिल भाजपा तालुका सरचिटनिस, गजान्न पा.कदम सोसेल मिडिया तालुका संयोजक, भाजपचे सक्रिय कार्यकर्ते साहेबराव पा. कदम, धम्मधिप भद्रे रिपाई गटाचे व्यापारि आघाडि जिल्हाप्रमुख, कैलास कदम, सतोष जाधव, वामन जाधव,ऊत्तम पा. जाधव, श्रीहरि कदम, मैनुद्दिन शेख सह प्रमुख ऊपस्थित होते. व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय ठरली.

एकूणच हे मोफत आरोग्य शिबिर सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले असून ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरले, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!