पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. ऐन मार्च महिन्यात राज्यात पाऊस सुरू आहे. राज्यातील अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. आजही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. मागील काही महिन्यापासून पाऊस सतत पडत आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होताना दिसत आहे.
आज राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होण्याची अंदाज आहे. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. आज राज्यातील काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले
सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिगोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोदिंया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल. यावेळी विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल. या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला..
Leave a reply













