राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे (३० जुलै) – राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्समधून दिनांक 14 जुलै 2025 रोजी झालेल्या तब्बल 60 लाख 45 हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपासून पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस स्टेशनच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचे उघड झाले.संयुक्त तपास पथकात राहुरी पोलीस स्टेशन, यवत पोलीस स्टेशन आणि पुणे जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. तपासामध्ये विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी (रा. पुणे), अतुल सुरेश खंडागळे (रा. पुणे) व त्यांच्या चार साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
मुख्य आरोपी विकी सिंग हा 90 गुन्ह्यांचा सराईत गुन्हेगार असून तो सध्या लोणीकंद, पुणे येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने गुप्त माहितीच्या आधारे त्याला अत्यंत शिताफीने अटक केली. प्रारंभी त्यास यवत येथील गुन्ह्यात अटक करून नंतर राहुरी गुन्ह्यातही अटक करण्यात आली.दिनांक 25 जुलै रोजी आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड मागण्यात आली असता 30 जुलै 2025 पर्यंतची रिमांड मंजूर करण्यात आली. सरकारी अभियोक्ता P.K. पाटील यांनी कामकाज पाहिले. या दरम्यान विकी सिंगने 4,95,269 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल तपास अधिकाऱ्यांच्या हवाली केला आहे.
आज आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर 2 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये पो.उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुर्हाडे, नदीम शेख, सचिन ताजने आणि सचिन धनात, दरेकर (अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय) यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पो.नि. संजय ठेंगे व विकास साळवे करत आहेत.
राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्स चोरी प्रकरण उलगडलं, आरोपींकडून ₹4,95,269/- किमतीचा सोन्याचा ऐवज जप्त

0Share
Leave a reply












