विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरात शंभर व दोनशेच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह स्थानिक व्यापार्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ व्यवहार करणारे, हातावर पोट असलेले दुकानदार आणि टपरीधारकांना याचा मोठा फटका बसत असून, बनावट नोटा स्वीकारून त्यांची फसवणूक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार टाकळी ढोकेश्वर शहरातील प्रेमाचा चहाच्या दुकानदाराला शंभर व दोनशे रुपयांची बनावट नेट,अभिजीत लेडीज शॉपी, सरकार पान शॉप,चिकने रसवंती गृह, एस मार्ट किराणा दुकानदाराला तीन दिवसांपूर्वी एका ग्राहकाने सामान खरेदी करताना दोनशे रुपयांची बनावट नोट दिली. व्यवहारानंतर दुकानदाराच्या ही बाब दुसर्या दिवशी लक्षात आली. प्राथमिक चौकशीत ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे टाकळी ढोकेश्वर परिसरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यात यापूर्वीही बनावट नोटांच्या काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे हे रॅकेट केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता आता ग्रामीण भागातही शिरकाव करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.टाकळी ढोकेश्वर मुख्य बाजारपेठेसह छोट्या दुकानांत, टपर्यांवर , आणि रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना बनावट नोटा स्वीकारण्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा व्यावसायिकांमध्ये बहुतेक जण हातावर पोट असलेले आहेत.
त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक त्यांच्यासाठी मोठे संकट ठरत आहे. मागील काही काळापासून अनेक प्रकारचे आर्थिक गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे लोक वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेत येत आहे.
टाकळी ढोकेश्वर परिसरात शंभर व दोनशे रुपयांच्या नवीन बनावट नोटा चलनात आणल्या आहेत. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी शक्कल लढवत शंभर व दोनशेच्या असली नोटा प्रमाणेच तशीच हुबेहूब नोटा तयार करून व्यवहारात आणली आहे. त्या असली व नकली नोटांच्या कागदात फरक आहे. ज्यांना याचा अभ्यास आहे ते लोक नोट हातात पडताच ती असली की नकली ओळखतात, मात्र त्या नोटा ओळखण्याचे आवाहन व्यापाऱ्यांसह वृद्धांसमोर आले आहे, तर पोलिसांसमोर बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटला पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
टाकळीढोकेश्वर परिसरात बनावट नोटांचा सुळसुळाट, शंभर,दोनशेच्या बनावट नोटांनी व्यापार्यांमध्ये चिंता

0Share
Leave a reply












