SR 24 NEWS

सामाजिक

अणदूर येथे उद्या शुक्रवार रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे उद्या शुक्रवार (दि. २० मार्च) रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आश्वमेघ मित्र मंडळ, अणदूर व सोलापूर येथील शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, परिसरातील गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सदर शिबिराचे आयोजन अणदूर येथील धनराज मुळे कॉम्प्लेक्स येथे सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या शिबिरात सोलापूर येथील अनुभवी व नामांकित नेत्रतज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया, रुग्णांसाठी जेवण व राहण्याची सोय, तसेच ने-आण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी स्वतःचे आधार कार्ड व रेशन कार्डच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या शिबिराचा अधिकाधिक गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उमाकांत करपे, अण्णाराव करपे व हनुमंत घुगे गुरुजी यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!