राहुरी : विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला शुक्रवार, दि. २० मार्चपासून प्रारंभ होत असून, या यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या यात्रेद्वारे तनपुरे हे गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधणार असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि आगामी नियोजन याबाबत माहिती देणार आहेत. पोटनिवडणुकीपूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.यात्रेची सुरुवात सकाळी ८ वाजता बारागाव नांदूर येथून होणार असून, त्यानंतर सकाळी १० वाजता बोरटेक, ११ वाजता मोमीन आखाडा येथे भेटी देण्यात येणार आहेत. दुपारी १२ वाजता मल्हारवाडी/घोरपडवाडी येथे सभा होणार आहे.
दुपारच्या सत्रात कणगर येथे दुपारी ३ वाजता, वडनेर येथे ४ वाजता, तर चिंचाळे येथे सायंकाळी ५ वाजता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिवसाची सांगता ताहराबाद येथे सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या सभेने होणार आहे.
या जनआशीर्वाद यात्रेमुळे मतदारांशी थेट संपर्क साधून तनपुरे पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. ही यात्रा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत रंगत; माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उद्यापासून प्रारंभ

0Share
Leave a reply












