SR 24 NEWS

इतर

मानोरीत सदरुद्दीन बाबा दर्गा व रामनवमी यात्रा उत्साहात; अध्यक्षपदी मनोजभाऊ खुळे यांची सर्वानुमते निवड

Spread the love

मानोरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील मानोरी येथे सदरुद्दीन बाबा दर्गा व रामनवमी उत्सव यंदा २४ ते २६ मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीच्या आयोजित बैठकीत अध्यक्षपदी मनोजभाऊ खुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हनुमान मंदिरासमोरील सभामंडपात यात्रा कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच ताराबाई वाघ होत्या. ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत शांततापूर्ण वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी कमिटीतील इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्षपदी दादासाहेब आढाव, खजिनदारपदी नामदेव पोटे, सहखजिनदारपदी पिरखाँभाई पठाण, कार्याध्यक्षपदी राजूभाई पठाण, सेक्रेटरीपदी नवनाथ थोरात तसेच सहसेक्रेटरीपदी गोकुळदास आढाव सर यांची निवड करण्यात आली.

यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, मानोरीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

बैठकीस गावातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!